पुन्हा:पुन्हा अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?; सामनातून सवाल
Saamana Editorial on Unseasonal Rain : अवकाळीचं संकट आणि शेतकऱ्यांची दुर्दशा; सामनातून सरकारला सवाल. पाहा व्हीडिओ...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखात अवकाळी पावसाचं संकट आणि शेतकऱ्यांची दुर्दशा यावर भाष्य करण्यात आलं आहे. आधीच्याच नुकसानभरपाईची मदत सरकारी कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. यामुळे आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात बळावते आहे. शेतकऱ्यांना रामभरोसे सोडून मिंधे सरकारचे राजे मात्र अयोध्येत श्रीरामासमोर शक्तिप्रदर्शन करत होते. चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येची यात्रा संपल्यानंतर मिंधे सरकार आता बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? बांधावर येणाऱ्या मिंधे सरकारला शेतकऱ्यांनी आता हे प्रश्न विचारलेच पाहिजेत!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

