Saamana : सत्तेतून पैसा अन् पैशांतून सत्ता…मंत्र्यांकडे मालच माल! तो येतो कुठून? ‘सामना’तून महायुतीवर घणाघात
निवडणुकीतील पैशांच्या वाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या लक्ष्मीसंबंधीच्या वादग्रस्त वक्तव्याने यात भर पडली आहे. सामनातून महाराष्ट्राचे राजकारण सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात अडकल्याचा घणाघात करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याचा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे राजकारण सध्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात अडकले असल्याचा घणाघात सामना मुखपत्रातून करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधूंमध्ये निवडणुकीतील पैशांच्या कथित वापरावरून राजकीय वॉर भडकले आहे. निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा टाकून लाखोंची रोकड जप्त केल्याचा दावा केला, तर नितेश राणेंनी ती व्यवसायाची रक्कम असल्याचे स्पष्टीकरण दिले.
याच दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष्मी येणार असे वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यावर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी पुन्हा वाद ओढवून घेतला. सामनाने या सर्व घडामोडींवरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माझ्याकडे चिक्कार पैसा आहे, तुम्ही निवडणुका जिंका या वक्तव्याचाही सामनातून उल्लेख करण्यात आला आहे. नगरविकास, महसूल, अर्थ यांसारखी खाती म्हणजे मालच माल असल्याचे सांगत, हा पैसा भ्रष्टाचारातून मिळवला जात असल्याचा आणि निवडणुकीत वापरला जात असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

