Saamana : शिंदेंचा पक्ष म्हणजे बुडबुडे… शिंदेंना भाजपकडून कवडीचीही किंमत नाही…’नाराजी’ नाट्य कोसळणार! ‘सामना’तून हल्लाबोल
नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बिहारला जातानाही शिंदे आणि फडणवीस-अजित पवार यांनी वेगवेगळ्या विमानांचा वापर केला. या सर्व घटनांमुळे शिंदे नाराज असून भाजप त्यांना कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही, अशी खोचक टीका सामना वृत्तपत्राने केली आहे. सामनानुसार, शिंदेंना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संबंधांवर सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. विविध सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांच्या देहबोलीतून आणि कृतीतून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच सामना वृत्तपत्राने शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात नाराजीनाट्य कोसळणार आहे, असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तर भाजप एकनाथ शिंदे यांना कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही आणि शिंदेंना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.
रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन माणसे फोडल्याच्या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही, असेही सामनाने म्हटले आहे. तर सामनाने शिंदेंचा पक्ष म्हणजे बुडबुडे आहेत आणि त्यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत असल्याचे म्हटले आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

