AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamna Editorial | मलिकांचे 'सत्य'कथन, गोवा भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या दलदलीत, 'सामना'तून टीकास्र

Saamna Editorial | मलिकांचे ‘सत्य’कथन, गोवा भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या दलदलीत, ‘सामना’तून टीकास्र

| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 8:15 AM
Share

देशातील कोरोना विषाणूचा धुमाकूळ बराच कमी झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा मात्र खाली बसायला तयार नाही. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आता दोन गंभीर आरोप केले आहेत. त्यातील एक आरोप ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते त्या काळातील आहे.

गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसंच कोव्हिड काळात गोवा भाजप सरकारने मोठा झोल केल्याचा आरोपही मलिक यांनी केला. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामनामधून गोव्याच्या भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे. भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’ कथन करुन ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली, असा टोमणा अग्रलेखातून मारला आहे.

देशातील कोरोना विषाणूचा धुमाकूळ बराच कमी झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा मात्र खाली बसायला तयार नाही. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आता दोन गंभीर आरोप केले आहेत. त्यातील एक आरोप ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते त्या काळातील आहे. दुसरा आरोप गोव्याच्या भाजप सरकारविरोधात आहे. जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असताना दोन ‘महत्त्वा’च्या फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची लाच देऊ केली गेली होती. मात्र आपण ते दोन्ही व्यवहार रद्द केले, असा दावा मलिक यांनी राजस्थानमधील एका मेळाव्यात बोलताना केला आहे.