AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी राणा यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर सचिन अहिर यांचा टोला; म्हणाले, 'फडणवीस यांची परवानगी...'

रवी राणा यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर सचिन अहिर यांचा टोला; म्हणाले, ‘फडणवीस यांची परवानगी…’

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 29, 2023 | 11:55 AM
Share

VIDEO | 'शरद पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यास अजित पवार हे मुख्यमंत्री बनणं अशक्य नाही' रवी राणा यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सचिन अहिर यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, 'रवी राणा यांनी वक्तव्य करण्याआधी देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का?'

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | शरद पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यास अजित पवार हे मुख्यमंत्री बनणं अशक्य नाही, असे वक्तव्य अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केले होते. रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आल्याते पाहायला मिळत आहे. रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सचिन अहिर यांना रवी राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘रवी राणा यांनी वक्तव्य करण्याआधी देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. तर शरद पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यास अजित पवार हे मुख्यमंत्री बनणं अशक्य नाही, असे रवी राणांच्या वक्तव्यानंतर सचिन अहिर यांनी टोला लगावत येत्या निवडणुकीत २०२४ ला आमचं सरकार येईल, असा दावा देखील सचिन अहिर यांनी केला आहे. तर रवी राणा यांनी केलंलं वक्तव्य हे भाकिताप्रमाणे आहे आणि हे फोडाफोडीचे सुरू असलेलं राजकारण केवळ सत्ताकारणासाठी चाललं आहे, असेही सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 29, 2023 11:55 AM
Follow Us