Saif Ali Khan Attack Update : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर, बघा व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Update : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर, बघा व्हिडीओ

| Updated on: Jan 17, 2025 | 4:46 PM

सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या घरात हल्ला झाला. त्या हल्ल्यात त्यांच्या पोटात चाकूचा तुकडा गेला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन तो चाकूचा तुकडा बाहेर काढला आहे

अभिनेता सैफ अली खानच्या शरिरातून काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आला असून हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. गुरूवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास सैफ अली खानच्या घरात एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली आणि त्याच्यावर हल्ला केला. यावेळी सैफवर चाकूचे सहा वार करण्यात आले. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. हल्लेखोराने सैफच्या पाठीत वार केल्याने त्याच्या मणक्यालाही गंभीर जखम झाली.घडलेल्या घटनेनंतर सैफला त्वरीत लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी दाखल कऱण्यात आलं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा सैफच्या शरिरातून बाहेर काढला. सैफच्या पाठीतून ६.३५ सेंटीमीटरचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आल्याची माहिती समोर आली. मात्र हा चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती असं डॉक्टरांनी सांगितले. सैफवर चोरट्याने एकूण सहा वार केले होते. पहिला वार गळ्यावर आणि इतर वार हातावर, पाठीवर केले होते. त्यापैकी शेवटचा सहावा वार हा सैफच्या स्पायनल कॉडवर केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, साडेसहा सेंटीमीटरपर्यंतचा हिस्सा सैफच्या शरीराच्या आतमध्ये घुसला होता. स्पायनल कॉडची जी मुख्य रक्तवाहिनी होती तिच्या पासून 2 मीमीच्या दूर हा चाकूचा तुकडा अडकला होता. जर हा तुडका दोन मीमी जास्त आतमध्ये घुसला असता तर पॅरालसीसी होण्याची शक्यता होती.

Published on: Jan 17, 2025 04:27 PM