Sambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल

संभाजीराजे अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत आशावादी असल्याचे दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. तसेच संभाजीराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 25, 2022 | 9:47 AM

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून (Rajyasabha Election) सध्या राजकारण शिगेला पोहोचले आहे. सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली गेली. मात्र तरीही राजे अपक्ष लढण्याच्या भूमिकवर ठाम राहिले. आधी आपला पाठिंबा राजेंना आहे असे सांगणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी नंतर आमचा पाठिंबा शिवसेनेच्याच उमेदवाराला राहील अशी गुगली टाकली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर राजे सेनेत येण्यास तयार नसल्याने शिवसेनेकडून अपक्षाला आम्ही मतदान करणार नाही. सेनेचाच उमेदवार असेल घोषित करण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेकडून संजय पवारांच्या (Sanjay Pawar) नावची घोषणा या जागेसाठी करण्यात आलीय. मात्र संभाजीराजे अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत आशावादी असल्याचे दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. तसेच संभाजीराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें