Sambhajinagar Crime News : पहिले अत्याचाराचा प्रयत्न, नंतर जीवघेणा हल्ला अन्.. ; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. या घटनेतील 19 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
संभाजीनगरमध्ये एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. अभिषेक नतपुते असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. अभिषेक नतपुतेकडून पीडित महिलेच्या चेहेऱ्यावर 15 पेक्षा अधिक वार करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे आरोपी अभिषेककडून महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्येचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे.
प्राथमिक माहितीनुसार अभिषेक हा पीडित महिलेकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करत होता. मात्र महिलेने नकार दिल्यानंतर त्याने रागात महिलेवर जीवघेणा हल्ला केला. यात धारधार शस्त्राने अभिषेकने पीडित महिलेच्या चेहेऱ्यावर 15 पेक्षा अधिक वार केले आहेत. तसंच डोक्यात दगड घालून पीडितेला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. आरोपी अभिषेक नतपुते याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली असून पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
