खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली : नवाब मलिक

माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला घेऊन त्यांनी पद्धतीने नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे.

मुंबई : माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला घेऊन त्यांनी पद्धतीने नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एक दलित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI