उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा भावनिक सवाल क्रांती रेडकरने पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

मुंबई :  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा भावनिक सवाल क्रांती रेडकरने पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुला रंगलेला आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच त्यांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नावेही घोषित केली आहेत. अशातच आज सकाळी क्रांतीने मुख्यमंत्र्यांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. ट्विटरवरुन तिने ते पत्र पोस्ट केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI