समृद्धीवर फडणवीस- शिंदेंच्या हाती स्टेअरिंग, सरकारची गाडी 3 ड्रायव्हर; CM म्हणाले, 8-8-8 तासांची शिफ्ट
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. समृद्धी महामार्गावरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीमधून प्रवास केला. यावेळी फडणवीस आणि शिंदेंच्या हातात गाडीचं स्टेअरिंग असल्याचं पाहायला मिळालं. सरकारची गाडी तीन ड्रायव्हर चालवतात, प्रत्येकाची आठ आठ तासांची शिफ्ट असते, असं देवेंद्र फडणवीसांनी मिश्कीलपणे म्हटलंय.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलं. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी समृद्धी महामार्गावरून एकाच गाडीतून प्रवास केला. सुरुवातीला एकनाथ शिंदेनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं. शिंदेंच्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस होते. अजित पवार मागच्या सीटवर बसले होते. समृद्धी महामार्गावरून शिंदेनी काही वेळ गाडी चालवली. त्यानंतर गाडीचं स्टेअरिंग मुख्यमंत्री फडणवीसांनी हाती घेतलं.
‘आम्ही तिघेही एकत्रित गाडी चालवतोय, काही काळजी करू नका. तीन शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही. चांगलं ड्रायव्हींग आहे. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. ड्रायव्हींगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे. आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये चालवतोय’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तर अर्धी अर्धी चालवायची अगोदरच ठरलेलं, असं शिंदे म्हणाले. अजित पवारांना त्यांना एकदम बसायला शांतपणे मागे येत एकदम रिलॅक्स मूडमध्ये. फडणवीस आणि शिंदेनी गाडी चालवली, पण अजित पवार कधी गाडी चालवणार असा पत्रकारांनी विचारला. त्यावर अजित पवार हे अंपायरच्या भूमिकेत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल

अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का

एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण...

ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?
