Samruddhi Mahamarg : दादा म्हणताय गार-गार वाटतंय, तर शिंदे फडणवीसांची मिश्कील प्रतिक्रिया बघाच…
आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवतोय, काळजी करू नका, आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. आम्ही तिघेही तिन शिफ्ट मध्ये गाडी चालवतो, असं मुख्यमंत्री म्हणाले तर शिंदे आणि दादा काय म्हणाले बघा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धीमहामार्ग अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. या समृद्धीमहामार्गामुळे मुंबई ते नागपूर असा प्रवास आता केवळ ८ तासात पुर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गावर एकूण ११ बोगदे आहेत त्यात ५ दुहेरी बोगदे आहेत. त्यांची एकूण लांबी २१.४६ किलोमीटर आहे. या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी ५२० किलो मीटरचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर ८० किलोमीटर आणि तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी २५ किलोमीटर असा आहे.
या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे हजर होते. यावेळी तिघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. शिंदेंनंतर फडणवीसांनी या गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं. प्रवास करताना दादा म्हणाले गारगार वाटतंय तर आम्ही तिघेही तिन शिफ्टमध्ये गाडी चालवतो, अशी मिश्कील प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

