Samruddhi Mahamarg Inauguration : शिंदेंच्या हातात गाडीचं स्टेअरिंग, फडणवीस, अजित पवार बॅक सीटवर; समृद्धी महामार्गावर काय घडलं?
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई ते नागपूर असा हा 107 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे. या महामार्गावर देशातील सर्वात मोठा 11 किमीचा बोगदा देखील तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक उंच खांबावर असलेला पूल आणि 32 मोठे पूल, 25 इंटरचेंज, 6 किलोमीटर ओव्हर पास तयार करण्यात आला आहे. या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या नव्या महामार्गावरून प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. तर या गाडीचं स्टेअरिंग शिंदेंनी आपल्या हाती घेत स्वत: समृद्धी महामार्गावरून गाडी चालवण्याचा आनंद घेतला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलेले होते. तर अजित पवार हे मागच्या सीटवर बसलेले दिसून आहे.

VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल

अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का

एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण...

ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?
