तासगावमध्ये संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील लढत; कोण विजयी होणार?
Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : 18 जागांच्यासाठी 39 उमेदवार रिंगणात; कोण बाजी मारणार? पाहा...
सांगली : राज्यातल्या बहुचर्चित तासगाव आणि आटपाडी मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी पाच वाजता मतमोजणी ही तासगाव आणि आटपाडी या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तासगावमध्ये एकूण 18 जागांच्यासाठी ते मतदान होत असून 39 उमेदवार रिंगणात आहेत. सहा मतदान केंद्रावर हे मतदान होत आहे. एकूण 1946 मतदार आपले मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर आटपाडी येथे 18 जागांसाठी मतदान होत असून 37 उमेदवार मतदानाच्या निवडणुकीत उभे आहेत. सात मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तासगाव आणि आटपाडी या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदाना मतदानाला सुरुवात झाली आहे. चुरशीने मतदान सुरू असल्यानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तासगावमध्ये भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या विरुद्ध रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील राष्ट्रवादी अशी सरळ लढत असून आटपाडीत गोपीचंद पडळकर विरुद्ध शिवसेनेचे तानाजी पाटील अशी सरळ लढत होत असल्याने या सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

