Sandeep Deshpande : त्यांना स्वत:च्या पक्षाच्या मनातलं कळत नाही, ते..; संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Sandeep Deshpande Slams Udhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर चांगलीच टीका केली असल्याचं दिसून आलं आहे.
उद्धव ठाकरेंना जनतेच्या मनातलं कळतं का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी जे राज्याच्या मनात आहे, शिवसैनिकांच्या मनात आहे तेच होईल, असं उत्तर दिलं होतं. त्यावर आता संदीप देशपांडे यांनी हा टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, भाजप विरोधात मतदान करून एकेकाळी शिवसेनेचे 63 आमदार लोकांनी निवडून दिले, परंतु उद्धव ठाकरे भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. त्यानंतर युतीला लोकांनी पाठिंबा दिला आणि ते शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. जिथं त्यांच्या पक्षातील नेते त्यांना सोडून जात आहेत. त्यांच्या मनातील कळालं नाही आणि ते काय जनतेच्या मनात सुरू आहे ते ओळखणार? असा टोला संदीप देशपांडेंनी लगावला होता.