औरंगाबादचं नामांतर, लढा अन् एमआयएमचं उपोषण; मंत्री संदिपान भुमरे यांची सविस्तर प्रतिक्रिया, पाहा…
Sandipan Bhumare : राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे टीव्ही 9 मराठीशी बोलताना औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केलं. पाहा ते काय म्हणालेत.
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे टीव्ही 9 मराठीशी बोलताना औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केलं. नामांतर व्हावं, म्हणून 35 वर्षांपासून लढा सुरू चालू होता. आता अखेर नाव बदलण्यात आलं आहे. हे दिल्यावर एमआयएम साखळी उपोषणाला बसलं आहे. त्यांना माझी विनंती आहे की, आनंदानं हे नामांतर स्विकारा. परंतु यात काही मोजके लोक राजकीय स्टंट म्हणून उपोषणाला बसले आहेत, असं भुमरे म्हणाले. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी औरंगजेबची कबर हैदराबादला हलवण्याची मागणी केली आहे. त्यावर भुमरे बोलले. जर छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध असेल तर आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनी त्यांच्या भावना त्यांनी प्रकट केल्या आहेत. विनाकारण वातावरण दूषित करु नये या मताचा मी आहे, असं भुमरे म्हणालेत.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

