Sandipan Bhumare | भावना गवळींच्या EDच्या छापेमारीबाबत मला काही माहिती नाही : संदीपान भुमरे
केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
भावना गवळींच्या EDच्या छापेमारीबाबत मला काही माहिती नाही, असे संदीपान भुमरे यांनी म्हटले. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावरून गवळी यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. आपल्याला ईडीची नोटीस आलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर ईडी होत असेल तर अनेकांच्या संस्था आणि कारखाने आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

