Sangli | तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन् जे झालं ते…..

Sangli | तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन् जे झालं ते…..

| Updated on: May 26, 2026 | 10:39 AM

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात ढोंगी बाबांच्या कारवायांबाबत संताप व्यक्त होत असतानाच सांगली जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या विटा परिसरातील ‘कडेश्वर धाम’मधील तिघा भोंदू बाबांविरोधात अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापुरुषांचा संचार असल्याचा दावा करत श्रद्धाळूंना जाळ्यात ओढणाऱ्या या कथित भोंदू बाबांनी पीडित मुलीची मानसिक फसवणूक केली. “तू मागच्या जन्मी नागीण होतीस आणि संकेतबाबा नाग होता, त्यामुळे या जन्मी तुमचं लग्न व्हावं म्हणून तुझा जन्म झाला,” अशी भ्रामक आणि अंधश्रद्धा पसरवणारी कथा सांगून मुलीचा विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर पीडित मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तपासात या तिघांकडून मुलीचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राज्यात पुन्हा एकदा भोंदू बाबांच्या वाढत्या कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, विटा पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

Published on: May 26, 2026 10:38 AM
Follow Us