'बंगल्याच्या खाली उत्खनन केलं तर...', 'वर्षा'वर काळी जादू? बंगला पाडणार? संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

‘बंगल्याच्या खाली उत्खनन केलं तर…’, ‘वर्षा’वर काळी जादू? बंगला पाडणार? संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

| Updated on: Feb 04, 2025 | 11:10 AM

मुख्यमंत्र्यासह शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत एक खळबळजनक दावा केलाय. काळी जादू केली असल्याने वर्षा बंगला पाडून त्याजागी नवीन वास्तू केली जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. यानंतर महायुतीचे नेते आणि राऊतांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळी जादू झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. मुख्यमंत्री होऊन दोन महिने झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला गेले नाहीत. काळ्या जादुमुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला घाबरताहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. काळ्या जादूबद्दल संजय राऊतांनी कुणाचही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. वर्षा बंगला पाडून त्या जागी नवीन वास्तू तयार करण्यात येणार असल्याचा दावाही राऊतांनी केला. वर्षा बंगल्याच्या खाली उत्खनन केलं तर बरंच काही सापडेल असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला. यावर शिंदेंच्या शिवसेनेने राऊतांना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर काळी जादू झाल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. वर्षा बंगल्याच्या खाली काय आहे याचा शोध केंद्रीय गृहमंत्रालयाने घ्यावा असं आवाहनच राऊतांनी केलाय. रामगोपाल वर्मांनी यावर एखादा चित्रपट काढावा असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राऊतांच्या दाव्यानूसार फडणवीस खरंच वर्षा बंगल्यावर जायला धजावत नाहीत का? वर्षा बंगला खरंच पाडण्यात येणार का? वर्षा बंगल्यावर खरंच काळी जादू करण्यात आलीये का? महाराष्ट्रातले राजकारणी काळ्या जादूचा आधार घेतात का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Published on: Feb 04, 2025 11:10 AM