AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या… संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: Jun 12, 2026 | 11:29 AM
Share

राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी यावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. देशातील काँग्रेस विचारधारेचे सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्रातही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेससोबतच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “देशातील काँग्रेस विचारसरणीशी संबंधित सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात प्रभावीपणे लढायचे असेल तर विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक आहे.”

राऊत यांनी पुढे सांगितले की, “केंद्रातील बकासूर शक्तींशी मुकाबला करायचा असेल तर समान विचारधारेचे पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबतच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

दरम्यान, या विषयावर संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी राज्याच्या राजकारणात या घडामोडींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jun 12, 2026 11:29 AM

Follow Us