Sanjay Raut : …पण मला मुख्यमंत्री करा, शहांकडे शिंदेंची मागणी; दिल्ली दौऱ्यावरून राऊतांचा खळबळजनक दावा काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असताना अचानक तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं. गुरू पौर्णिमेनिमित्त त्यांनी त्यांचे गुरू अमित शाह यांचे पाद्यपूजन केले, असा आरोप राऊतांनी केला.
मला मुख्यमंत्री करा, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याच्यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांना म्हटलं, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासादार संजय राऊत यांनी केला. आमचा गट भाजपात विलीन करू पण मला मुख्यमंत्री करा, असं एकनाथ शिंदे अमित शाह यांना दिल्लीत म्हणाले असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. इतकंच नाहीतर मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष भाजपात विलीन करण्याची एकनाथ शिंदेंची तयारी असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या मनात काय आहे? असा सवाल केला. त्यावर शिंदे म्हणाले. मला मुख्यमंत्री करणं हा त्यावरचा उपाय आहे. मी मुख्यमंत्री झालो तर सगळ्या गोष्टी मी थांबवेन आणि महाराष्ट्रातील राजकाराणाला स्थैर्य मिळेल‘, असं शिंदे शहांना म्हणाल्याचे संजय राऊत म्हणाले आणि एकच खळबळ उडाली.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

