अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भविष्यात राहणार नाही; संजय राऊतांचे मोठे विधान

| Updated on: Jun 02, 2026 | 11:12 AM

शिवसेना शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या एका वक्तव्याने सध्या सगळीकडेच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या वक्तव्यावर अनेक नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सत्तारांना आता प्रमुख नेत्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना (उबाठा) गटातील संजय राऊतांनी या प्रकरणावर धारदार वक्तव्य केले आहे.

शिवसेना शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या एका वक्तव्याने सध्या सगळीकडेच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या वक्तव्यावर अनेक नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सत्तारांना आता प्रमुख नेत्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना (उबाठा) गटातील संजय राऊतांनी या प्रकरणावर धारदार वक्तव्य केले आहे. नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केले.

राऊत म्हणाले, “सत्तारांचे हे वैयक्तिक मत असेल, त्यांना शिंदे गटासोबत गेल्याचा पश्चाताप झाला असेल. कोणीतरी मला सांगितले की काही नेते तर भाजपला ‘स्लो पॉयझन’ देखील म्हणत आहेत; जर कोणाला असे वाटत असेल तर त्याने उद्धव ठाकरेंच्या छत्रछायेखाली यावे. काहींना आमच्या पक्षात मज्जाव असेल हे नक्की आहे.” पुढे राष्ट्रवादीतील मतभेदांबाबत संजय राऊत म्हणाले, “मी वारंवार सांगतो, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भविष्यात राहणार नाही.”

Published on: Jun 02, 2026 11:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us