“भाजप हा राजकारणातील सीरियल किलर आणि सीरीयल रेपिस्ट”, संजय राऊत यांचा घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, “भाजपनं शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीला फोडलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकांना पकडून राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर भाजपनं दावा करायला लावला आहे. भाजप हे राजकारणातील सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट आहे. पक्ष एका विशिष्ट आकड्यात फोडायचा आणि त्या पक्षाला दावा करायला लावायचा. महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचं नाव नष्ट करायचं. त्यांचा इतिहास नष्ट करायचं काम भाजप करत आहे. भाजप स्वतः काही करत नाही. जे स्वतः काही करत नाही ते दुसऱ्याचा इतिहास नष्ट करतात. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील त्यांनी हे प्रयत्न केले आहे.”
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!

