Sanjay Raut Video : बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? भाजपच्या ‘त्या’ बड्या नेत्यांचं नाव घेत राऊतांचा धसांना खोचक सवाल
सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी गेल्याचे पाहायला मिळाले. ही भेट कोणत्या कारणासाठी सुरेश धसांनी घेतली याचं स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांसमोर दिलं. मात्र विरोधकांनी सुरेश धसांना या भेटीवरून चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळतंय.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे सातत्याने पहिल्यादिवसापासून थेट आणि आक्रमक भूमिका घेताना दिसताय. अशातच सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी गेल्याचे पाहायला मिळाले. ही भेट कोणत्या कारणासाठी सुरेश धसांनी घेतली याचं स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांसमोर दिलं. मात्र विरोधकांनी सुरेश धसांना या भेटीवरून चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळतंय. अशातच आज ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘चंद्रशेखर बावनकुळे त्यांचे बॉस आहेत असे धस म्हणतात. देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का?’असा खोचक सवाल संजय राऊत यांनी सुरेश धस यांना केला. ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्याच क्षणी सुरेश धस यांनी त्या बैठकीतून बाहेर पडले पाहिजे होते, याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे बाहेर येऊन माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झाला आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो. हिम्मत आहे का सांगायची? असा रोखठोक सवाल करत आता का आक्रोश करताय? असं म्हणत संजय राऊत यांनी सुरेश धसांवर हल्लाबोल चढवला आहे.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
