Sanjay Raut : तुमच्या रक्तात आणि दुधात भेसळ.. ; भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर राऊत संतापले
Sanjay Raut On Bhayyaji Joshi : भाजपचे भय्याजी जोशी यांनी मराठी ही मुंबईची भाषा नाही, असं म्हंटलं आहे. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. महायुटीने आपली हीच भूमिका आहे का हे स्पष्ट करावं अशीही मागणी केली आहे.
भय्याजी जोशी यांच्या विरोधात महाराष्ट्र विधिमंडळामध्ये निषेध ठराव आणावाच लागेल. नसता तुम्ही मराठी आईचे दूध पिलेले नाही, तुमच्या रक्तात आणि दुधात भेसळ आहे अशी खणखणीत टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचे भय्याजी जोशी यांनी काल मुंबई दौऱ्यावर असताना म्हंटलं होतं. त्यावर आज राऊत यांनी हल्लाबोल करत महायुती आणि भाजपवर टीका केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मराठी ही राजभाषा असल्यामुळे भय्याजी जोशी यांचे वक्तव्य राजद्रोह आहे. भय्याजी जोशी यांचे वक्तव्य महायुती सरकारने कसे सहन केले? दोन मिंद्या आणि लाचार उपमुख्यमंत्र्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध करायला हवा. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत येऊन असे वक्तव्य करण्याचे धाडस त्यांनी कसे केले? मुंबई ही मराठी माणसाची नाही हा अपमान नाही का? देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जोशींने केलेले वक्तव्य अधिकृत भूमिका आहे का? हे जाहीर करावे आणि तसे नसेल तर विधिमंडळात भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करायला हवा, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

