Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा काढला बाप अन् थेट केला सवाल; म्हणाले, ‘तुमच्या…’
VIDEO | 'सत्ता तुमच्या ताब्यात आहे, म्हणून मनमानी करणार का?', उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाप काढला, म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का?'
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | दादर येथील शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. शिवसेना आणि दसरा मेळावा याचं वेगळंच नातं आहे. मात्र आता शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने यंदा कुणाचा आवाज शिवतीर्थवर घुमणार, याची उत्सुकता राज्यातील प्रत्येकाला आहे. दरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट याच मुद्द्यावरून आमने-सामने आलेत. अशातच ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाप काढल्याचे पाहायला मिळाले. आम्ही खरी शिवसेना, आम्ही बाळासाहेबांचे विचार पाळतो. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची आम्हालाच परवानगी द्यावी, अशी मागणी करत शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला असताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? असा सवालच उपस्थित केला आहे. बघा काय म्हणाले संजय राऊत?
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

