शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट…

शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट…

| Updated on: Sep 02, 2026 | 2:26 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात धनुष्यबाण चिन्हावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरु होती. या सुनावण्यामध्ये ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आज आता शिंदे गटातील वकील युक्तिवाद करणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना प्राणाहून प्रिय असलेल्या धनुष्यबाण चिन्हाची मागणी गोठवणे हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. न्यायदेवतेवर आपला विश्वास असून, जनतेनेही आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवला. धनुष्यबाण गोठवण्याची वेळ कोणी आणली, असा सवाल करत राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. राऊत म्हणाले की, “या चोरांनीच ही वेळ आणली आहे.” अमित शहांना डाकू संबोधत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे पवित्र धनुष्यबाण चोरल्याचा आरोप केला. चोरीचा माल आपला म्हणून निवडणुका लढवत असल्याचा दावा करत, राऊत यांनी मुद्देमाल जप्त करा, अशी मागणी केली. एकनाथ शिंदे यांना कायदा कळतो का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या चिन्हाभोवतीचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

Published on: Sep 02, 2026 2:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us