Thackeray Brothers : जर महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची एकजूट तर मविआची होणार ताटातूट, राऊतांचं मोठं विधान काय?
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा मराठी लोकांचा दबाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय तर दुसरीकडे मात्र स्थानिक निवडणुकीत मविआ एकत्रितपणे लढणार नाही असेही स्पष्ट संकेत संजय राऊत यांनी दिलेत.
एकीकडे राज ठाकरेंनी समर्थकांना कोणत्याच विषयावर न बोलण्याचे आदेश दिलेले असताना दोन्ही ठाकरे बंधूंची युती व्हावी हा मुंबईतल्या मराठी माणसांचा दबाव असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरेंनी युतीची साथ देऊन जरा सावध भूमिका घेतली असली तरी उद्धव ठाकरेंकडून स्पष्टपणे युतीचा आवाहन करण्यात येतंय. राऊतांच्या या विधानावर मात्र मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही कारण राज ठाकरेंनी नेत्यांनाच काहीही न बोलण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे मनसेच्या बाळा नांदगावकरांनी बच्चू कडूंच्या शेतकरी यात्रेत सहभागी होऊन पाठिंबा दिला. मात्र आदेशानुसार युतीवर कोणतेही भाष्य केलं नाही. दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीत जर एकत्र आले तर मविआचं काय? या प्रश्नावर राऊतांनी मोठं विधान केल्याचे पाहायला मिळाले. बघा राऊत काय म्हणाले?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

