Sanjay Raut UNCUT | एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं, म्हणत संजय राऊतांचा पलटवार
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत, “संजय राऊत नोटा मोजत होते का?” असा सवाल उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत, “संजय राऊत नोटा मोजत होते का?” असा सवाल उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. “हो, मी बॅगा मोजत होतो. कारण त्यांचे लोक बॅगा घेऊन फिरत होते आणि त्याबाबतची माहिती मला मिळत होती. त्यामुळे मी बॅगा मोजत होतो. नोटा मोजण्यासाठी आता माझ्याकडे वेळ नाही,” असे राऊत यांनी म्हटले.
नाशिकमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, “गोकुळ गीते यांच्यावर दबाव आणला जात होता. त्या वेळी बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या डिक्कीत पैसे होते, अशी माहिती आम्हाला मिळाली होती.” तसेच, “जर तुम्ही निवडणूक जिंकणारच आहात, तर मग उमेदवारांवर दबाव आणण्याची गरज काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी पुढे आरोप केला की, दबाव टाकून उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले जात आहे. “एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातही बॅगा दिसतात, त्याचाच हा परिणाम आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी स्वतःबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “आम्ही फाटके लोक आहोत. आम्ही नोकरी करणारे, नोकरदार वर्गातील लोक आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे बरोबरच बोलत आहेत. आम्ही त्यांच्या बॅगा मोजत होतो,” असे म्हणत त्यांनी उपरोधिक शब्दांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे.
Published on: Jun 06, 2026 12:08 PM
एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा,
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर!
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353

