AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....

Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले….

| Updated on: Oct 06, 2026 | 2:06 PM
Share

इंडिया आघाडीचे खासदार आज संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार आहेत. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी लोकशाही धोक्यात असल्याची भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणांचा दाखला देत राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली

इंडिया आघाडीचे खासदार आज संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. राऊत यांनी म्हटले की, ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म सहामधील बदलांमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत होईल, अशी भूमिका घेतली आहे.

या मोर्च्यादरम्यान खासदारांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सशस्त्र दल आणि नाकाबंदी करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. हे लोकशाहीच्या विरोधात असून सरकार खासदारांना घाबरले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याचा संदर्भ देत राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले. देशभरात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि सरकारला याची दखल घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

 

Published on: Oct 06, 2026 02:06 PM

Follow Us