चोमडेपणा करू नका, चंद्रकांत पाटील काय शिवाजी महाराजांचे वशंज आहेत का?- संजय राऊत

स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati} आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील बाहेर आला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील कोण? ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी […]

आयेशा सय्यद

|

May 28, 2022 | 4:40 PM

स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati} आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील बाहेर आला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील कोण? ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी 2019 ला मोडलेल्या शब्दाचा खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कुणाची आहे? शब्द कोणी मोडला? फसवलं कुणी? इतरांनी चोमडेपणा करू नये. या सर्व प्रकरणात त्यांचा काय संबंध आहे? हा आमचा प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले. भाजपला एवढंच वाटत असेल तर त्यांनी त्यांची 42 मते संभाजीराजेंना द्यावीत. त्यांना आम्ही उत्तरं का द्यायचं? आमच्या पक्षातील प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनाही उत्तर का द्यायचं? फडणवीस आमच्या पक्षात येणार आहेत का?, असा सवाल राऊत यांनी केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें