AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत

Sanjay Raut | अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत

| Updated on: Mar 31, 2026 | 11:38 AM
Share

अशोक खरात प्रकरणात दररोज नवी नावं समोर येत असून आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचेही नाव चर्चेत आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले की, “या संदर्भात नीलम गोऱ्हे यांनीच स्वतः स्पष्टीकरण द्यावे,” असे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.

अशोक खरात प्रकरणात दररोज नवी नावं समोर येत असून आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचेही नाव चर्चेत आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले की, “या संदर्भात नीलम गोऱ्हे यांनीच स्वतः स्पष्टीकरण द्यावे,” असे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. मात्र, त्यांनी वादग्रस्त विधान करत म्हटले की, “या प्रकरणात कोणीही लपून राहिलेले नाही; सगळेच त्या खरातच्या हमाममध्ये उघडे पडले आहेत.” तसेच, या प्रकरणात आणखी कोणाकोणाची नावं पुढे येणार, याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “मी कोणाची नावं घेणार नाही. मात्र, खरातने ज्या व्यक्तींची नावं घेतली आहेत, त्याच्याकडे कोण येत होतं, कोणाचे संपर्क क्रमांक आहेत, याची माहिती पोलिसांनी किंवा एसआयटीने जाहीर करावी.” दरम्यान, या वक्तव्यामुळे अशोक खरात प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 31, 2026 11:38 AM
Follow Us