VIDEO : Sanjay Raut | ऑन रेकॉर्ड सांगतो, सेना भवनावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना असच उत्तर दिलं जाईल – संजय राऊत

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. मात्र, शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्याब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. मात्र, दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र बघायला मिळते आहे. त्यावरच आज प्रसारमाध्यमांना बोलताना संजय राऊत म्हणाले की, ऑन रेकॉर्ड सांगतो, सेना भवनावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना असच उत्तर दिलं जाईल