वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी सांगितलं गुपित
शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला; महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “नरेंद्र मोदींनी केटरिंग सुरू केले आहे का? ऊटसुठ ते फुटीर खासदारांना भेटीसाठी, चहापानासाठी, जिलेबी-फाफडा खायला बोलवतात. त्यांच्याकडे खासदारांना भेटायला वेळ आहे, मात्र संसदेत येण्यासाठी वेळ नाही, हे दुर्दैवी आहे.” पुढे त्यांनी सांगितले की, कोर्टात शिवसेना कुणाची? याबाबत सुनावणी सुरू आहे. त्यासाठी मोदी हे फुटीर खासदारांना पाठीशी असल्याचं सांगत आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अलीकडेच ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली; यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. इतकेच नाही तर इतर पदाधिकाऱ्यांनीसुद्धा पंतप्रधानांची भेट घेतली.
Published on: Aug 08, 2026 10:27 AM
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं