“शिंदे कुठल्या नोटीसची गोष्ट करताहेत? ईडीने डोळे वटारल्यावर पळून गेले ना ते”, संजय राऊत यांचा पलटवार
वर्धापन दिनाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एक नोटीस येताच त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती, असं विधान केलं. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : वर्धापन दिनाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एक नोटीस येताच त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती, असं विधान केलं. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ईडीने नुसते डोळे वटारले तर एकनाथ शिंदे पळून गेले आणि पक्षांतर केलं. ते कुठल्या नोटीसची गोष्ट करताहेत,” असा टोला राऊत यांनी लगावला. “संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून अनेक दिवस साजरे केले जातात. आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, योगा डे साजरा करतो. तसंच आजचा दिवस हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातला काळा दिवस आहे. या गद्दारीची दखल जगातल्या 33 देशांनी घेतली असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला वाटतं, जगात अशा घटना घडत असतील पण ही सर्वात भयंकर घटना होती. त्यामुळे या दिवशी गद्दारांना जोडे मारावेत. त्यांचं स्मरण करावं, यासाठी या दिवसाची जागतिक गद्दारी दिवस म्हणून आजचा दिवस साजरा व्हावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तसं कळवलं आहे. पंतप्रधान युनोमध्ये जाणार आहेत. त्यांना माझं आवाहन आहे. की जसं त्यांनी योगा डे साजरा व्हाला यासाठी प्रयत्न केले तसं यासाठी पुढाकार घ्यावा. कारण महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी त्यांनीही प्रयत्न केलेले आहेत. या गद्दारीत त्यांचंही योगदान आहे. त्यामुळे त्यांना याची तीव्रता लक्षात येत असेल,” असंही राऊत म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

