Sanjay Raut Uncut | विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा? संजय राऊत यांचे मोठे विधान काय?

| Updated on: Apr 22, 2026 | 11:44 AM

विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीच्या (MVA) एका जागेबाबत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राऊत म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली असून, उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असतील तर त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.

विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीच्या (MVA) एका जागेबाबत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राऊत म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली असून, उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असतील तर त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील आणि तो लवकरच जाहीर केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच, “विधिमंडळात शिवसेना पक्षप्रमुख असणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं आहे. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे आघाडी अधिक एकसंध राहील,” असं राऊत यांनी नमूद केलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

 

 

Published on: Apr 22, 2026 11:44 AM
Follow Us