Sanjay Raut : कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला
Sanjay Raut Press : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी 24 तासांमध्ये घेऊन येतो हे राज्याचे अर्थमंत्री सांगत आहे. 500 कोटी ही छोटी रक्कम नाही. कोणाचे लुटणार आहात एवढे पैसे? असा घणाघाती प्रश्न खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गावातल्या एका कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार तिथे जाऊन ठाण मांडून बसलेले आहेत. बाकी राज्याचे प्रश्न वाऱ्यावर गेले. राज्यातल्या इतर कोणत्याही कामासाठी त्यांच्याकडे पैसे नाही, अशी खरमरीत टीका देखील राऊतांनी यावेळी अजित पवार यांच्यावर केली आहे.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे राष्ट्रीय नेते आहेत आणि अजून गावातूनच फिरत आहे. हे या राज्याचे दुर्दैव आहे की असे नेते या राज्याला मिळाले, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. 500 कोटी हा काही लहान आकडा नाही, तुम्ही कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? असा सवाल राऊतांनी केली आहे. 500 कोटी हा काही लहान आकडा नाही, तुम्ही कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? असा सवाल राऊतांनी केली आहे.