Sanjay Raut : शिंदेंची दाढी कोण कापणार? संजय राऊतांनी केला मोठ खुलासा!
Sanjay Raut Slams Eknath Shinde : संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.
शिवसेनाउबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे महाराष्ट्रात ‘जय गुजरात’ म्हणतात, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला किंमत नाही. ते आता महाराष्ट्राचे राहिलेले नाहीत. शिंदेंची दाढी बनावट आहे, आणि ती दाढी अमित शहा कधी कापतील हे त्यांना कळणारसुद्धा नाही. ही दाढी गद्दारांची, अफजलखान आणि शाहिस्तेखान यांच्यासारखी आहे, अशी तिखट शब्दांत टीका राऊतांनी केली आहे. संजय राऊत आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर देशभरात हिंदी सक्तीविरोधात वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात याविरोधात ठिणगी पडल्याचे चित्र आहे. राऊत यांनी सांगितले की, अनेक राज्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आणि महाराष्ट्राच्या या भूमिकेचे स्वागत केले. ते पुढे म्हणाले, या मेळाव्यामुळे आम्हाला केंद्र सरकारविरोधात लढण्याची नवी ताकद मिळाली आहे. आम्ही हा लढा सुरू ठेवू, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
