Sanjay Raut Full Press | हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; पश्चिम बंगाल निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या निकालावरून पंतप्रधान नरेद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपवर सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून निवडणुका जिंकत असल्याचा गंभीर आरोप केला. “भाजप 365 दिवस फक्त निवडणुका जिंकण्याचा सराव करत असतो. देशाचे गृहमंत्री 20-20 दिवस बंगालमध्ये राहतात. अशा परिस्थितीत ही खरी लोकशाही निवडणूक म्हणता येणार नाही,” असे ते म्हणाले.

राऊत यांनी पुढे दावा केला की, विरोधकांनी निवडणुका लढवू नयेत अशी भाजपची मानसिकता असल्याचे दिसते. तसेच पाकिस्तान आणि रशियामधील निवडणुकांप्रमाणेच भारतातही निकाल आधीच ठरलेले असल्याचा आरोप करत त्यांनी टोला लगावला. महिला मतदारांच्या पाठिंब्याबाबत पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महिला विधेयक मंजूर झाले, पण अंमलबजावणी कुठे आहे? केरळमध्ये महिला साक्षरता जास्त असूनही भाजपला तिथे यश का मिळाले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “दिवा विझण्यापूर्वी जसा फडफडतो, तशीच स्थिती भाजपची झाली आहे.” त्यांनी इंदिरा गांधींचा संदर्भ देत सत्तेचा माज कायम राहत नाही, असेही नमूद केले.
याशिवाय शेअर मार्केट आणि रुपयाच्या घसरणीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “हा लोकशाहीचा विजय नसून मोदी-शहांचा विजय आहे. अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. हा निकाल म्हणजे मोदींच्या पतनाची सुरुवात आहे,” असा दावा राऊत यांनी केला.
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज...
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी....