Sanjay Raut : .. म्हणून कुणालाही मारहाण करायची का? राऊतांचा थेट सवाल
संजय गायकवाड यांच्या व्हायरल व्हिडीओवरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
शिंदे गटाचे बुलढण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. तर कँटिनमध्ये देण्यात येणारं जेवण हे निकृष्ट दर्जाचं होतं आस संजय गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी टीका करत संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोफत धान्यवाटप सुरू आहे त्यांची गुणवत्ता काय आहे हे पाहणं गरजेचे आहे. फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना मिळाले नाही. आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू आहेच म्हणून काय आमदाराने अशी मारहाण करायची का? आमदाराने कुणालाही मारावे आणि मग आपली भूमिका मांडावी हे काय सुरू आहे. सरकार आणि त्यांचे आमदार हे गरिबांना मारत आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जी मारहाण झाली ती करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही राऊतांनी सांगितलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

