Sanjay Raut | भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्यावरुन राजकारण पेटलं आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं, कारण… राऊत लोकसभेतील मुद्यावर स्पष्टच बोलले
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्यावरुन राजकारण पेटलं आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
राऊत म्हणाले, बेकायदेशीर पद्धतीने विजय मिळवण्याच्या संदर्भातलं हे बिल होतं. डिलीमीटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी… महिलांच्या नावाखाली 850 जागा वाढवायच्या यापेक्षा दुसरा कोणताही हेतू नव्हता. या निमित्ताने देशामध्ये उत्तर वि.दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्ताने त्यांना पुरूष वि. महिला असा संघर्ष पेटवायचा होता. आम्हीच महिलांचे एकमेव तारणहार हा नॅरेटिव्ह त्यांना या निमित्ताने सेट करायचा होता असा आरोपी राऊतांनी केला.
पुढे संजय राऊत म्हणाले, महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल, लोकसभेत आणलं , त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना असा काही नव्हता.