Sanjay Raut | भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची तर नशा नाही; संजय राऊतांनी डिवचले

Sanjay Raut | भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची तर नशा नाही; संजय राऊतांनी डिवचले

| Updated on: Apr 21, 2026 | 11:26 AM

विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर आता संजय राऊतांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यासोबतच त्यांनी काही खळबळजनक आरोपही केले.

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं, ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर आता संजय राऊतांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यासोबतच त्यांनी काही खळबळजनक आरोपही केले.

नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते म्हणाले, महिला आरक्षणाचा आणि लोकसभेत आणलेल्या विधेयकाचा काडीमात्र संबंध नाही. ते विधेयक फक्त डिलिमिटेशनच्या उद्देशानेच होतं. भाजपचे नेते आणि स्वतः मुख्यमंत्री काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही. अलीकडे मुंबईसह इतर ठिकाणांहून ड्रग्स जप्त होतंय, त्याची नशा आहे का ही? ते इतरांच्या पातळीविषयी बोलतात, त्यांची पातळी काय? एकूणच संजय राऊत आज पत्रकार परिषदेत अगदी थेट, मात्र जिव्हारी लागेल असं बोलले.

Published on: Apr 21, 2026 11:26 AM
Follow Us