पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत… संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
राजकारणातील वादविवाद, दावे आणि प्रतिदावे काही नवे नाहीत. मात्र, आता यात संजय राऊतांच्या एका विधानामुळे भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सुचक मुद्द्यावर सटीक भाष्य केले. यावेळी त्यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचाही उल्लेख केला.

राऊत म्हणाले, ‘आजपर्यंत कोणीच विरोधी पक्ष असा फोडला नाही, जसा मोदी-शहांनी फोडला आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर देखील अनेकांनी टीका केल्या. अटलबिहारी वाजपेयी देखील त्यांच्या विरोधात भरपूर बोलले, मात्र त्यांनी कधी पक्ष फोडला नाही. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथच्या गुफेत जावे आणि त्यांच्या या बारा वर्षांच्या कालावधीबाबत आत्मचिंतन करावे, त्यांच्या सहकाऱ्यांनाही सोबत घेऊन जावे.’ संजय राऊतांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
पुढे ते म्हणाले, ‘पंडित नेहरूंंच्या जागेवर राहण्याचा विक्रम मोदी मोडत आहेत, मात्र त्यांच्या कार्याचा विक्रम ते कधीच मोडू शकणार नाहीत. पंतप्रधान पदाची फक्त घोडदौड सुरू आहे. या घोडदौडीखाली लोकशाही, निवडणूक आयोग, सामान्य जनता सर्व काही तुडवले जात असल्याचा’ गंभीर आरोपही राऊतांनी यावेळी केला
Published on: Jun 09, 2026 11:00 AM
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....