Sanjay Shirsat : निधीचा प्रश्न विचारताच, संजय शिरसाट यांचा काढता पाय अन् पत्रकारांसमोर जोडले हात
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा आतापर्यंत ८१० कोटी ६० लाखांचा निधी वळवण्यात आला आहे. यासह वर्षभरात सामाजिक न्याय विभागाचा ६ हजार ७६५ कोटी रूपयांचा निधी वळवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
सामाजिक न्याय विभागाचा तब्बल ४१० कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी मिळत नसल्याचीही चर्चा होताना दिसतेय. अशातच शिंदेंच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही, अशी तक्रार आहे, असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर म्हणाले. तर ‘शिंदेच्या मंत्र्यांना निधी मिळतो का?’ असा प्रश्नही माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारताच संजय शिरसाट यांनी काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर त्यांनी असा सवाल केल्यानंतक पत्रकारांसमोर हातच जोडले. तर शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशा चर्चा होत असताना दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला असल्याचे माहिती आहे.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...

मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश

हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज

एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?
