Team India Victory Parade : गुजरात पाकिस्तानात येतं का? ‘त्या’ बसवरून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिरसाटांनी फटकारलं
आज संध्याकाळी मुंबईत भारतीय संघातील खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. ही विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे. ही बस व्हिक्ट्री परेडसाठी सज्ज असून गुजरातहून ही बस आणली आहे. गुजरातवरून आणलेल्या या बसवरून आदित्य ठाकरे यांनी विरोध केलाय. यावरून आता राजकारण केलं जात आहे.
गेल्या तीन दिवसांपासून बार्बाडोस इथं आलेल्या वादळामुळे भारतीय संघ T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर अडकलं होतं. अखेर बुधवारी संपूर्ण भारतीय संघ एअर इंडियाच्या विशेष विमानाने टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून थेट आपल्या मायदेशी परतले. तर आज संध्याकाळी मुंबईत भारतीय संघातील खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. ही विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे. ही बस व्हिक्ट्री परेडसाठी सज्ज असून गुजरातहून ही बस आणली आहे. गुजरातवरून आणलेल्या या बसवरून आदित्य ठाकरे यांनी विरोध केलाय. यावरून आता राजकारण केलं जात आहे. अशातच शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदित्य ठाकरेला प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याशिवाय काय येतं. गुजरातहून बस आणली तर गैर काय? गुजरात काय पाकिस्तानमध्ये येतं का?’, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?

