AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Victory Parade : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

Team India Victory Parade : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

| Updated on: Jul 04, 2024 | 1:28 PM
Share

T20 World Cup 2024 Winning Team Indias Victory Parade : टीम इंडियाचे मायदेशी स्वागत झाल्यानंतर खेळाडूंनी आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत टीम इंडिया खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. दुपारी ४ वाजता मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं आगमन होणार आहे. मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे.

T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाचे मायदेशी स्वागत झाल्यानंतर खेळाडूंनी आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत टीम इंडिया खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. दुपारी ४ वाजता मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं आगमन होणार आहे. मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे. ही बस व्हिक्ट्री परेडसाठी सज्ज आहे. मरीन ड्राईव्हवर १ किलोमीटरपर्यंत टीम इंडियाची विजयी मिरवणूक असून संध्याकाळी ५ ते ७ पर्यत दोन तास ही मिरवणूक असणार आहे. या विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर यावेळी रोहित शर्मा बीसीसीआयचे सचिव जय शाहांकडे वर्ल्डकपची ट्रॉफी सुपूर्द करणार आहे.

Published on: Jul 04, 2024 01:28 PM