T20 World Cup 2024 : टीम इंडिया मायदेशी दाखल, बघा भारतीयांकडून कसं झालं दणक्यात स्वागत?
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी धूळ चारत विजय मिळवला. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 अंतिम फेरीत 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव करुन तब्बल 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. दरम्यान, या विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतणार आहेत.
बार्बाडोसमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंडियाच्या अंतिम सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी धूळ चारत विजय मिळवला. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 अंतिम फेरीत 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव करुन तब्बल 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. दरम्यान, या विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतणार त्यावेळीच नैसर्गिक स्थितीमुळे भारतीय खेळाडूंची वाट वादळानं रोखली. मात्र आज बीसीसीआयने प्रायव्हेट जेट पाठवून टीम इंडियाच्या खेळाडूंना मायदेशी आणण्याची सोय केली आणि सर्व खेळाडू मायदेशी परतले. टीम इंडियाचे खेळाडू भारतात दाखल झाल्यानंतर त्याचं दिल्लीकरांनी दणक्यात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडिया नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाल्या त्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. इतकंच नाहीतर भारतीय संघ पंतप्रधानांसह अल्पोआहार घेणार असल्याचीही माहिती मिळतेय.
Published on: Jul 04, 2024 12:54 PM
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
