Sanjay Shirsat | राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, ‘दुसऱ्यांच्या आशीर्वादावर जगणारे…’

Sanjay Shirsat | राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, ‘दुसऱ्यांच्या आशीर्वादावर जगणारे…’

| Updated on: Apr 19, 2026 | 3:03 PM

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडले होते, ते विधेयक नामंजूर झाले. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यानंतर मंत्री संजय शिरसाटांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, ”काल नरेंद्र मोदींनी भाषण केले, त्यावेळी सबंध भाषणात 86 वेळा काँग्रेसचे नाव घेतले. ते देशाला काँग्रेसमुक्त करायला निघाले आहेत, मात्र त्यांच्याच नसानसात, रक्तात, शब्दात काँग्रेस आहे. हो, आम्ही एकजूट होऊन विधेयकाला विरोध केला, कारण देशात काँग्रेसशिवाय योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही, हे मोदी स्वतःच त्यांच्या असल्या कृतीतून दाखवून देतात.” असा आरोप राऊतांनी केला.

यावर संजय शिरसाट म्हणाले, ”नरेंद्र मोदींसारख्या खंबीर माणसावर आरोप करताना संजय राऊतांनी स्वतःची पातळी पाहावी. दुसऱ्यांच्या आशीर्वादावर जगणारी ही लोकं मोदींवर टीका करतात, म्हणूनच त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही.’

Published on: Apr 19, 2026 3:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us