Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
Dhananjay Deshmukh Statement : बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना वेगवगळ्या जेलमध्ये ठेवण्यात यावे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं, अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. याबद्दल गृहमंत्रालयाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचं देखील धनंजय देशमुख म्हणाले. उद्याच आपण या संदर्भात गृहमंत्रालय आणि पोलीस अधिक्षक यांना या संदर्भात असर्ज करणार असल्याचं देखील देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, हत्येला 4 महिने झाले आहेत. जेल प्रशासनात घडलेला जो घटनाक्रम आहे तो बघता आम्ही आमच्या सगळ्या फिर्यादीना घेऊन एक अर्ज पोलीस अधिक्षक आणि गृहमंत्रालयाला देणार असून सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याची मागणी करणार आहे.’ असं देशमुख यांनी म्हंटलं.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

