Santosh Deshmukh Case : मस्साजोगमधील ग्रामस्थांचं आंदोलन स्थगित | VIDEO
Beed Massajog Protest : बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाबाबत काही मागण्यांसाठी कालपासून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे.
मस्साजोगमधील ग्रामस्थांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करावी आणि प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना कठोर शिक्षा द्यावी यासह एकूण सात मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होतं.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास मंद गतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अद्यापही या प्रकरणात आरोपींच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे कालपासून संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. मात्र आता या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. उज्वल निकम यांच्याकडून काही मागण्या मान्य करण्यात आल्याचं ग्रामस्थानी सांगितलं आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरत स्थगित करण्यात आलेलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

